करिश्मा करतेय या व्यक्तीला डेट ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ मे २०२३ ।  ‘जिगर’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अजय आणि करिश्मा यांच्या नात्याची सुरुवात झाली. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. त्यानंतर करिश्माचं नाव अभिनेता सलमान खान याच्यासोबत जोडण्यात आलं.

रिपोर्टनुसार, करिश्मा आणि सलमान रिलेशनशिपमध्ये देखील होते. पण दोघांनी त्यांच्या नात्याचा खुलासा कधीही केला नाही.. शिवाय दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे कोणते पुरावे देखील नाही… फक्त अजय देवगण, सलमान खान नाही तर, करिश्मा कपूर हिचं नाव अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. जवळपास ५ वर्ष दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं लग्न होवू शकलं नाही. पण अभिषेक आणि करिश्मा यांच्या नात्याच्या चर्चा तर रंगल्याचं पण दोघांचे फोटो देखील समोर आले होते.

अभिषेक बच्चन याच्यापासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने २००३ साली श्रीमंत उद्योजक संजय कपूर यांच्यासोबत लग्न केलं… पण दोघांचं नात जास्त वर्ष टिकू शकलं नाही. नात्यामध्ये अनेक चढ-उतार आल्यानंतर दोघांनी २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. संजय आणि करिश्मा यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं नाव समायरा आहे, तर

मुलाचं नाव कियान आहे…
घटस्फोटा दरम्यान अभिनेत्रीने सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले.. घटस्फोटानंतर २०१८ मध्ये करिश्माचं नाव संदीप तोषनीवाल यांच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं… पण सध्या संदीप आणि करिश्मा यांच्या नात्याबद्दल अधिक काही कळू शकलेलं नाही. पण सध्या करिश्मा तिच्या आगामी ‘ब्राऊन’, ‘मर्डर मुबारक’ वेब सीरिजमुळे चर्चेत आली आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिची चर्चा रंगत आहे.
करिश्मा कपूर ९० च्या दशकात अभिनय जगतात अव्वल होती. गोविंदा, शाहरुख खान यांसारख्या स्टार्ससोबत देखील तिने स्क्रिन शेअर केली. ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर १’, ‘साजन चले ससुराल’ आणि ‘जीत’ यांसारख्या सिनेमांमधून करिश्माला स्टारडम मिळाले. आमिर खानसोबतचा ‘राजा हिंदुस्तानी’ आणि शाहरुख खानसोबतचा ‘दिल तो पागल है’ने करिश्माच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम