तुमच्या नावाने कुणी सिमकार्डचा वापर करतय का ? या टिप्स जाणून घ्या !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ डिसेंबर २०२२ ।  आपण नेहमी सायबर गुन्हेगारी पासून दूर राहण्याचा नक्कीच पूर्ण प्रयत्न करीत असतो पण नेहमी आपल्या मोबाईलमध्ये अनेक सीमकार्ड वापरत असतो आपण जेव्हा ते सीम कार्ड घेण्यासाठी जातो तेव्हा त्याठिकाणी ओळखीचा पुरावा देतच असतो. आपण अनेकदा ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर करतो. परंतु, तुमचे आधार कार्ड वापरून इतर व्यक्तीने सिम कार्ड तर घेतलेले नाही ना? अनेकदा आपल्या नावाने कोण सिम कार्ड वापरत आहे.

याची आपल्याला माहितीच नसते. एका आधार कार्डवर केवळ ९ मोबाइल नंबर रजिस्टर असतात. सिम कार्डचा वापर करून ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. तुमच्या नावावर रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल नंबरचा वापर करून चुकीचे काम केले जाऊ शकते. त्यामुळे आधार कार्डची फोटो कॉपी अनोळखी व्यक्तींना देणे टाळावे. तुम्हाला देखील तुमच्या नावावर किती सिम कार्ड वापरले जात आहेत, हे जाणून घ्यायची एक सोपी प्रोसेस उपलब्ध आहे. यासाठी सरकारने खास वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सर्वात प्रथम https://tafcop.dgtelecom.gov.in/ या वेबसाइटवर जा.

त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल.

आता तुम्हाला एक ओटीपी येईल. हा ओटीपी व्हेरिफाय करा.

येथे तुमच्या नावावर रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल नंबरची लिस्ट दिसेल. तुम्ही जर एखादा नंबर वापरत नसल्यास रिपोर्ट देखील सबमिट करू शकता.

Action बटनवर क्लिक केल्यास तुम्हाला This is not my number, Not required, Required हे पर्याय दिसतील. यातील This is not my number वर क्लिक करून रिपोर्ट करा.

मात्र, लक्षात घ्या की ही सेवा सध्या केवळ आंध्र प्रदेश, केरळ, राजस्थान, तेलंगाना, जम्मू-काश्मिर, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या राज्यातील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. लवकरच इतर राज्यातील नागरिक देखील या वेबसाइटचा वापर करू शकतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम