भ्रष्टाचारातील राष्ट्रवादी आता स्वच्छ झाली का ? थेट मोदींना सवाल !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ ऑगस्ट २०२३  | गेल्या काही महिन्याआधी भाजप नेते देवेद्र फडणवीस हे म्हणत होते कि, मी एक वेळ लग्न न करणे, अविवाहित राहणं पसंत करेन. मात्र राष्ट्रवादीशी युती करणार नाही. नाही…नाही… नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर भाषणात राष्ट्रवादी ही भ्रष्टाचारी पार्टी असल्याचे सांगत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनी ७० हजार कोटींचा भ्रष्टाचाराचे आरोप राष्ट्रवादीवर केले होते.

तर आपण भ्रष्टाचार करणाऱ्या कुणाला सोडणार नाही असे देखील त्यांनी सांगितल होते. त्यानंतरच अजित पवार आणि त्यांचा गट हा भाजपच्या सत्तेत सहभागी झाला होता. त्यावरूनच शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह अजित पवार आणि त्यांच्या गटावर टीका केली आहे. आपल्यावर ईडीची कारवाई होईल याच भीतीने अजित पवार यांच्यासह सर्व आमदार भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. तर ज्या पार्टीला मोदी भ्रष्टाचारी म्हणत होते ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता स्वच्छ झाली का असा सवाल एकनाथ खडसेंनी मोदी यांना केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम