आंदोलनावर बंदी आहे का? असेल तर सरकारने जाहीर करा; शिंदे सरकारवर राऊतांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ डिसेंबर २०२२ । राज्यातील भाजप नेते व राज्यपाल कोश्यारी यांनी वेळोवेळी बेताल वक्तव्य करीत राज्यातील सामाजिक व्यवस्था बिघडविण्याचे काम करीत असल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने मुंबईत मोठे आंदोलन उभे केले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया देत शिंदे सरकारवर हल्लाबोल चढविला आहे.

लोकशाही मार्गाने आंदोलनावर बंदी आहे का?, तसे असेल तर सरकारने ते जाहीर करावे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांना शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. तर उद्याचा मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कुणीही करणार नाही, कारण उद्याचा मोर्चा हा विरोधकांचा नसून महाराष्ट्र प्रेमींचा आहे, जर मोर्च्याला परवानगी नाकरली तर सरकार महाराष्ट्र द्रोही ठरेल असे राऊतांनी म्हटले आहे.
उद्याच्या मोर्चासाठी आम्ही रितसर परवानगी मागितली आहे. महाराष्ट्रात आणि देशात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात बंदी आली असेल तर सरकारने तसे जाहीर करावे. मागच्या नाही पुढच्या दाराने कुणी आणीबाणी कुणी आणली आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. उद्याचा होणारा मोर्चा हा विरोधी पक्षाचा नसून महाराष्ट्र प्रेमींचा आहे. महाराष्ट्रातील दैवतांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फूले, यांचा अपमान सुरू आहे. दुसरीकडे बोम्मई फुरफरताय महाराष्ट्राचे उद्योग बाहेर खेचून नेले जात आहे.महाराष्ट्रावर अन्याय होतोय आणि तरीही राज्य सरकार शांत बसतंय. असे म्हणतानाच महाराष्ट्र प्रेमींना आवाीन केले आहे की मोर्चाला यावे, या मोर्चाला जर सरकार परवानगी नाकारत असेल तर राज्यात महाराष्ट्र द्रोही सरकार बसले आहे, असे म्हणावे लागेल असेही राऊतांनी म्हटले आहे.

राज्य सरकारमधील लोकांनी आमच्यासोबत मोर्च्यामध्ये यायला हवे, कारण हा मोर्चा महाराष्ट्रासाठी असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. मला वाटत नाही की परवानगी नाकारण्याची हिंमत कुणी करेल, कारण त्यांचे राज्याच्या जनतेमध्ये फार वेगळे प्रतिक्रिया उमटतील असा इशाराच संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे. मोर्चा जाहीर झाला आहे, तो होणारच आहे. राज्यात घटनाबाह्य सरकार बसले आहे, त्यामुळे लोकशाही मार्गाने असलेल्या मोर्चाला विरोध करणे सुरू आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपमधील काही लोकांचे मेंदू किड्या मुंग्यांचे मेंदू आहेत, असे मला म्हणावेसे वाटतंय. घटनाकार बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाही का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.त्याच नात्याने आम्ही म्हणालो की ते आमचे आहे. जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मत झाला तेव्हा राज्य निर्माण झाले नव्हते, एकच मुंबई प्रांत होता, सत्ताधाऱ्यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचाबद्दल काय मत आहे हे आता कळतंय, त्यांच्या मनात महापुरुषांबद्दल आदर नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. सत्ताधारी पक्ष हे निर्लज्ज असून लाचार आहे, केवळ आमच्याविरोधात गांडूळासारखे बोलतात असा टोला राऊत यांनी लगावला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम