इशिता दत्ता आणि वत्सल शेठ यांनी दिली गोड बातमी !

advt office
बातमी शेअर करा...

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक जोडी असलेले इशिता दत्ता आणि वत्सल शेठ हे आहेत. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले जाते आणि ते खूप क्यूट देखील आहेत. हे दोघेही आता आई – बाबा झाले आहेत. वत्सल सेठ आणि इशिता दत्ताने 19 जुलै रोजी त्यांच्या मुलाचे स्वागत केले.

अभिनेत्री इशिता दत्ताने बुधवारी तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. रिपोर्टनुसार, ‘मुल आणि आई निरोगी आहेत. शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. दोघांचे कुटूंब सर्वात आनंदी आहे.
इशिता दत्ता नेहमीच तिच्या फॅन्स आणि फॉलोअर्सना तिच्या कौटुंबिक जीवनाबद्दल आणि तिच्या स्वभावाबद्दल अपडेट करते. तिने तिचे बेबी बंप आणि पती वत्सल दाखवणारे अनेक सेल्फी गरोदरपणात शेअर केले आहेत. 28 नोव्हेंबर 2017 रोजी ‘बेपनाह प्यार’ फेम अभिनेत्री इशिता दत्ताने तिचा ‘बाजीगर’ फेम अभिनेता वत्सल शेठसोबत लग्नगाठ बांधली. या वर्षी 31 मार्च रोजी, या जोडप्याने घोषित केले की ते त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यास तयार आहेत. तिने कलर-ऑर्डिनेटेड पोशाख घातलेला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये वत्सल इशिताच्या बेबी बंपकडे टक लावून पाहत आहे. काही दिवसांपूर्वी इशिता दत्ताच्या आईने अभिनेत्रीसाठी बेबी शॉवरचे आयोजन केले होते. इशिताने तिच्या बंगाली बेबी शॉवरचा एक व्हिडिओ शेअर केला ज्याला सोशल मीडियावर खूप पसंती मिळाली.

इशिताने फंक्शनसाठी गुलाबी रंगाची बनारसी साडी नेसली होती आणि ती खूपच सुंदर दिसत होती. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, ‘गोदभराई फंक्शन. या काही क्षणांसाठी, हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी सर्वांचे आभार. एकुणच आई झाल्याने इशिता दत्ता आणि वत्सल शेठ दोघेही खुप खुश आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम