इस्रायलचा हमासवर जोरदार पलटवार !
बातमीदार | ८ ऑक्टोबर २०२३
आज सुरु झालेल्या युद्धावर आता हामासचे पाठीराखे मुस्लिम देशांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कतर आणि सौदीचाही समावेश आहे. इस्रायलवर फिलिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. यावर इस्रायलने केलेल्या पलटवारात गाजामध्ये कमीतकमी १९८ लोक मारले गेले आहेत. तर १६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
महत्वाचे म्हणजे काही दिवसांतच सौदी हा इस्रायलशी मैत्री करणार होता. कतरच्या परराष्ट्र मंत्रालयाने हमासची बाजू घेतली आहे. गाझा पट्टीतील स्थितीवर चिंता व्यक्त करतो. तनाव संपवून शांतता राखण्याचे आवाहन करत आहोत. इस्रायलकडून अधिकारांच्या उल्लंघनामुळे सध्याचा तणाव वाढला आहे. यामध्ये फिलिस्तानी लोकांचा छळ आणइ अल अक्सा मशीगीवर इस्रायल पोलिसांची वारंवार छापेमारी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायाला वैधानिक पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. इस्रायलवर आंतरराष्ट्रीय कायद्याचे कठोर नियम लादले जावेत. पॅलेस्टिनी लोकांच्या ऐतिहासिक अधिकारांचा आदर करण्यासाठी इस्रायलला सक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सौदी अरेबिया अनेक पॅलेस्टिनी गट आणि इस्रायली सैन्यांमधील अभूतपूर्व परिस्थितीवर बारकाईने निरीक्षण करीत आहे. अनेक आघाड्यांवर उच्च पातळीवरील हिंसाचार झाला आहे. देशांनी दोन्ही बाजूंमधील तणाव तात्काळ थांबवावा, नागरिकांचे संरक्षण करावे आणि संयम ठेवावा असे आवाहन करत आहोत, असे म्हटले आहे. सततच्या ताब्यामुळे, पॅलेस्टिनी लोकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवल्यामुळे आणि त्याच्या पवित्रतेविरूद्ध चिथावणी देत राहिल्याने परिस्थितीच्या स्फोटाच्या धोक्यांबद्दल वारंवार इशारे देण्यात आले होते, असे सौदीने म्हटले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम