
सरसकट प्रमाणपत्र द्या ; मनोज जरांगे यांची मागणी !
बातमीदार | ७ सप्टेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. त्यामुळे उपोषणाचा परिणाम आता त्यांच्या प्रकृतीवर पण होताना पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वी आरोग्य विभागचे एक पथक उपोषणास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान मनोज जरांगे यांची बीपी कमी झाली असून, त्यांच्या किडनीवर परिणाम होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहेत.
सरकारच्या अध्यादेशाची प्रत आपल्याकडे आली नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची गरज आहे, आमच्याकडे वंशावळीचे दस्तावेज नाहीत, वंशावळीचे दस्तावेज नसल्याने आम्हाला फायदा होणार नाही, सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे म्हणत वंशावळ शब्दांत सुधारणा करत सरसकट अशी सुधारणा करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील म्हणाले की, वंशावळ नसणाऱ्यांनी सरसकट आरक्षण द्यायला हवे, आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णय मान्य केला आहे. आम्ही 10 पाऊडले मागे येण्यास तयार आहोत. निर्णय स्वीकारला असला तरी आमचे आंदोलन सुरूच राहणार आहोत, आम्हाला सरकारला वेठीस धरायचे नाही. आज किंवा उद्या जीआरमध्ये बदल करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमची मुळ मागणी आहे की मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. अधिकाऱ्यांकडून शब्दांचे खेळ होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. 2 दिवसांत सरकारने जीआारमधील शब्दांत सुधारणा करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम