तणाव व चिंता या आजाराबाबत बोलणे महत्वाचे !
दै. बातमीदार । ७ नोव्हेबर २०२२ देशात सर्वांनाच मानसिक आरोग्य ही एक मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे. पण लोक याबाबत बोलणे टाळत असतात पण हा छोटा आजार जरी असला तरी भविष्यात तो आजार मोठा होवू शकतो त्यामुळे आपल्या डॉक्टराशी याबाबत बोलले पाहिजे.अनेकांना मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टी समजत नाहीत. यामुळेच लोक त्यातून पूर्णपणे सावरत नाहीत. किंवा त्यांना त्यातून सावरायला वेळ लागतो. आजही असे बरेच लोक आहेत ज्यांना तणाव (Strees), मूड स्विंग (Mood Swing) आणि चिंता (Anxiety) हे एकच आजार वाटतात. मात्र, यामध्ये बराच फरक आहे.
तणाव आणि चिंता एकसारखे नाही
अनेकदा लोकांना तणाव आणि चिंता यातील नेमका फरक कळत नाही. कारण या दोन्ही आजारांतील लक्षणं जवळपास सारखीच आहेत. जसे की, हृदयाचे ठोके अचानक जलद गतीने वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, किंवा अतिसार, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या जाणवणे. या दोघांमध्ये थोडाफार फरक नक्कीच आहे.
तणाव आणि चिंता यांच्यातील फरक नेमका काय?
तणावाचा अवधी खरंतर फार कमी कालावधीच्या स्वरूपात असतो. अनेकदा हा तणाव आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे ट्रिगर होतो. जसे की, ऑफिसमध्ये कामाचा भार खूप जास्त आहे, जवळच्या व्यक्तीशी वाद होणे किंवा काही दीर्घ आजारामुळे नाराज होणे. तणावाची इतर काही लक्षणे देखील असू शकतात. जसे की, राग येणे, एकटेपणा जाणवणे, चिडचिड होणे, मळमळ किंवा चक्कर येणे. अनेक बाबतीत तणाव वाढला की नैराश्यही येऊ शकते. त्यामुळे तणावाचे योग्य वेळी दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे.
चिंता : याला आपण दीर्घकाळची चिंता म्हणूनही म्हणू शकतो. चिंताग्रस्त व्यक्तीला अस्वस्थता, विनाकारण भीती वाटणे, घाम येणे, जुलाब किंवा बद्धकोष्ठता, झोपेची समस्या, अस्वस्थ वाटणे यासारख्या समस्या जाणवू शकतात. Anxiety मध्ये ट्रिगर पॉईंट ओळखणे थोडे कठीण होते. कारण, व्यक्ती कशामुळे ट्रिगर झाली आहे हे साधारण या आजारात कळून येत नाही.
मूड स्विंग : मूड स्विंगची समस्या खरं तर तणाव आणि चिंतांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. मूड स्विंग्स म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या भावनिक अवस्थेत अचानक होणारा बदल. मूड स्विंग्स दरम्यान, एखादी व्यक्ती विनाकारण खूप आनंदी किंवा उत्साही वाटू शकते. तसेच, काही काळानंतर ती व्यक्ती दुःखी, चिडचिडी किंवा रागही येऊ शकतो. मूड स्विंगच्या आजारात, एखाद्या व्यक्तीच्या भावना खूप वेगाने बदलतात आणि कधीकधी त्याला स्वतःला देखील समजत नाही. आपली जीवनशैली मूड स्विंगला चालना देण्यासाठी एक प्रमुख घटक असू शकते. उदाहरणार्थ, घर किंवा नोकरी बदलणे, पुरेशी झोप न घेणे, सकस आहार न घेणे इ. याशिवाय माणसाच्या शरीरात हार्मोनल बदलही होतात.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम