देशाला गौरव मिळवून देणाऱ्या खेळाडूसोबत उभं राहणं गरजेचं – सानिया मिर्झा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ एप्रिल २०२३ ।  दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानात कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या नेतृत्त्वात पैलवानांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला आता राजकीय, तसंच क्रीडा क्षेत्रातूनही पाठिंबा वाढत चालला आहे. मात्र, तरीही सरकारकडून अद्यापही या कुस्तीपटूंचं म्हणणं ऐकलं जात नाहीय. सुप्रीम कोर्टानं मात्र या आंदोलनाची दखल घेत आज सुनावणी घेतली. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी आज ब्रिजभूषण यांच्याविरोधात FIR दाखल केला जाईल अशी माहिती दिली आहे. भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झानं याविषयी ट्वीट केलं आहे.

 

तिनं म्हटलंय, “एक खेळाडू, पण त्यापेक्षा अधिक एक महिला म्हणून खेळाडूंना आंदोलन करताना पाहणं खूप अवघड आहे. या खेळाडूंनी आपल्या देशाला गौरव मिळवून दिला आहे आणि आपण सर्वांनी त्यांचा आनंदही साजरा केला आहे. त्यामुळे या कठीण काळात त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे. “ही अत्यंत संवेदनशील बाब आहे आणि खेळाडूंनी गंभीर आरोप केले आहेत. मला आशा आहे की त्यांना लवकर न्याय मिळेल.”

“भारतीय क्रीडापटू जेव्हा देशासाठी पदकं मिळवतात तेव्हाच नाही तर नेहमीच आपल्यासाठी अभिमानास्पद असतात,” असं ट्विट माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी केलं आहे. ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा यानं पत्रक काढून कुस्तीपटूंच्या आंदोलनावर भाष्य केलंय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम