तो भिडे नाही किडे ; आव्हाडांची विखारी टीका !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २० ऑगस्ट २०२३ | राज्यातील काही ठिकाणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्य करीत असल्याने त्यांना आता विरोधकांनी चांगलेच घेरले असून यात आता राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तो मनोहर भिडे आहे की काय? पण तो विकृत विचाराचा म्हातारा आहे, हेच खरे अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, तो भिडे नाही किडे आहे. त्याच्यावर कारवाई होणार नाही. हरयाणात जशी बिट्टू बजरंगीने दंगल पेटवली. तशी दंगल पेटवण्याची या भिडेला जबाबदारी दिली आहे. कसेही करून हिंदू-मुसलमान दंगल पेटव हे भिडेला सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, संभाजी भिडेला विरोध करणारा महाराष्ट्रातील पहिला माणूस कोण? तो मीच आहे, असेही आव्हाड यांनी छातीवर हात मारत सांगितले.राष्ट्रवादीचे पुण्यात सोशल मीडिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी आव्हाड पुण्यात आले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम