बॉलिवूड नव्हे तर हे सडले आहे ; का म्हणाला सनी देओल ?

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही वर्षापासून बॉलिवूड क्षेत्राला बदनाम होत चाललेले असतांना अनेकांनी आता याकडे पाठ फिरवीत असतांना दिसून येत असतांना बॉलिवूड अभिनेता सनी देओलने मोठ विधान केली आहे. सध्या आपल्या आगामी चित्रपट गदर 2 च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बऱ्याच काळाने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर सनीला पाहता येणार आहे.

अंमली पदार्थांचे व्यवहार, व्यसनं यांमुळे बॉलिवूड बदनाम झालं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याविषयी बोलताना सनी म्हणाला की, बॉलिवूड सडलेलं नाही, माणसं सडलेली आहेत. आणि ती कोणत्या क्षेत्रात नसतात? ते सांगा मला. आम्हाला प्रसिद्धीचं वलय मिळालेलं असल्याने त्यांना आमच्याकडे बोट दाखवायला मजा येते, असं विधान सनी देओल याने केलं आहे. त्यापूर्वीही एका मुलाखतीत सनीने आपण आयुष्यभर दारू, ड्रग्ज आणि पार्टी कल्चरपासून लांब राहिल्याचं सांगितलं होतं. आपण कधीही या भानगडीत पडलो नाही. मला शिस्त पसंत असून याच कारणामुळे मला एक निरोगी आयुष्य आणि देखणं व्यक्तिमत्त्व मिळाल्याचंही सनी या मुलाखतीत म्हणाला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम