लहेंगा चोलीत ‘न्यासा’ला क्षणभर ओळखणे झाले कठीण

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ ऑक्टोबर २०२२ । अभिनेता अजय देवगण व अभिनेत्री काजोल ची लाडकी लेक काही दिवसापासून सोशल मिडीयावर प्रंचड व्हायरल होत असतांना दिसत आहे तर दिवाळीत ती शाहरुखचा मुलगा आर्यन सोबत दिवाळी पार्टीत सुद्धा आढळून आली होती, तेव्हा हि तीचे काही फोटो व्हायरल झाले होते.

 

अजय देवगणने आणि काजोल यांनीही दिवाळीचे काही फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात न्यासा अतिशय सुंदर दिसत आहे.

 

न्यासा देवगण हि आता 19 वर्षांची झाली आहे. अलीकडेच दिवाळी पार्टीतील न्यासाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आणि तिच्या ट्रान्सफॉर्मेशनची चांगलीच चर्चा रंगू लागली. लहेंगा चोलीत न्यासाला क्षणभर ओळखणे कठीण झाले होते. न्यासा आता तिची आई काजोलची हुबेहुब कार्बन कॉपी वाटतेय. दिवाळीत तिचे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पुर्वीच्या तुलनेत आता न्यासा अतिशय ग्लॅमरस दिसू लागली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम