राज्यातील या जिल्ह्यात होणार तीन दिवस पाऊस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ मार्च २०२३ । राज्यात गेल्या काही दिवसापासून उन्हाळ्याचे उन तापत होते पण दोन दिवसापासून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शेतकरीच्या डोक्यावर भार आला आहे बातमीही अशीच काही आहे. पावसाचे अवकाळी पाऊस येणार असून त्याने शेतकरीचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल. शिवाय आज देखील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी आज पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, आज राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज नाशिकसह धुळे बुलढाणा आणि पालघर जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांसह धुळे तालुक्यात मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात आणि परिसरात मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात बदल झाला असून ढगाळ वातावरण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे मका, पपई, केळी आणि उशिरा लावलेल्या गहू, हरभरा या पिकांवर काही प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम