दिवाळीपूर्वी राज्यात बरसणार पाऊस !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ नोव्हेबर २०२३

राज्यात सध्या हिवाळ्याचा थंडावा सुरु असतांना मागील काही दिवसांपासून तापमानात चढ उतार होत आहेत. सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला होता.यात आता पावसाची भर पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकण किनारपट्टीवर 3 दिवस मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस गोवा आणि दक्षिण कोकण किनारपट्टीवर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार कराड तालुक्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे ऊसतोडीवर परिणाम झाला आहे. मात्र हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम