सदावर्ते यांच्या गाड्याची तोडफोड करणारे मराठा नसतील ; मनोज पाटील !
बातमीदार | २६ ऑक्टोबर २०२३
राज्यात मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु झाले आहे तर दुसरी कडे प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्याची अनोळखी इसमांनी तोडफोड केल्यानंतर हे राजकीय युद्ध रंगले आहे. यात आता मनोज जरांगे पाटील यांनी झालेल्या घटनेचा निषेध करीत यात माझा काही संबध नाही असे वक्तव्य केले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांची कोणी गाडी फोडली असेल तर त्याचे समर्थन होणार नाही. तोडफोड करणारे मराठा समाजाचे नसतील, असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे. सरकारने आरक्षणाचा विषय संपवावा, अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. वास्तविक सदावर्ते यांच्या गाड्यांच्या तोडफोड प्रकरणी मला काहीच माहिती नाही, मराठा शांततेत आंदोलन करत असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. हजारो गावात शांततेच आंदोलन सुरु असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आज मराठा आंदोलकांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केली. त्यामुळे सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी केली. यावर जरांगे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. मराठ्यांमध्ये माणुसकी जिवंत आहे. मराठ्यांनी सरकारचे खूप लाड केले. त्यांचे पोरबाळं आम्ही मोठे केले. समाजातील कोण कोण श्रद्धेय मराठ्यांना आरक्षण मिळवू देत नाहीत हे सर्वांना माहित असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम