जडेजाच्या पत्नीची गुजरात विधानसभेत लढवणार निवडणूक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० नोव्हेबर २०२२ गुजरात विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर राजकीय नेते मंडळी पंतप्रधान मोदी यांच्यासह प्रमुख नेत्याच्या भेटीगाठी सुरु झाल्या आहे. तर प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची बायको रिवाबा जाडेजा ही देखील निवडणुकीच्या रिंगणार उतरली आहे. नुकतीच, भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान, जडेजाची पत्नी रीवाबा हिचे तिकीट पक्के केले आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा हिला जामनगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

रिवाबाने 2019 साली भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी तिने जामनगर उत्तरमधून तिकीट मागितल्याची चर्चा होती. सध्या इथून भाजपाचेच धर्मेंद्रसिंह जाडेजा आमदार आहेत. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून इथे भाजपाची सत्ता आहे. भाजपा यावेळी सुद्धा आपला गड कायम राखण्याचा प्रयत्न करेल.2017 गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने 99 आणि काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम आदमी पार्टीच्या प्रवेशामुळे भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम