पुन्हा जेलवारी घडवणार ; राणेंचा राऊतांवर हल्लाबोल !
दै. बातमीदार । ६ जानेवारी २०२३ राज्यात ठाकरे गट व भाजप यांचे कोणत्या ना कोणत्या मुद्याची लढाई होत असतांना नुकतेच केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे.
संजय राऊत यांना आपण पुन्हा जेलवारी घडवणार, असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तर नारायण राणेंनी केलेल्या हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी देखील तिखट शब्दांमध्ये ‘माझ्या नादाला लागू नका. झाकली मुठ सव्वा लाखाची’, असे म्हणत पलटवार केलाय.
26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचे कात्रण आपण जपून ठेवले असल्याचे वक्तव्य कणकवलीत आयोजित एका कार्यक्रमात नारायण राणेंनी केले आहे. आता संजय राऊत यांनी देखील त्यांच्याच शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे म्हणाले, नारायण राणेवर बोलले की पत्रकारांची ब्रेकिंग न्यूज होते. याचमुळे सामनाचे कात्रण मी जपून ठेवले आहे. ते मी वकीलाकडे पाठवले आहे. मी वाचून विसरणारा नाही दखल घेणारा आहे. माझा स्वभाव वाईट असल्याचा टोला राणे यांनी संजय राऊतांना लगावला. नारायण राणे म्हणाले, 26 डिसेंबरचा अग्रलेख मी राखून ठेवलाय. त्यातील प्रत्येक वाक्य न वाक्य मी लक्षात ठेवले आहे. संजय राऊतला मी सोडणार नाही. त्याच्यावर लवकरच केस दाखल करणार. संजय राऊतने 100 दिवस तुरुंगात घालवले. ते कमी पडलेत. त्यामुळे पुन्हा एकदा मी रस्ता मोकळा करत असल्याचा इशारा यावेळी नारायण राणे यांनी दिला आहे.
यावेळी नारायण राणे यांनी मीडियाला एक विनंती केली आहे. ते म्हणाले, कोकणासाठी काम करणारे जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या चांगल्या कामाला पोचपावती द्या. चांगले शब्द त्यांच्यासाठी लिहा. संजय राऊत नारायण राणे यांच्यावर पलटवार करताना म्हणाले, यांच्यासारखे डरपोक आणि पळपुटे ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललेलो नाही. माझ्या नादाला लागू नका. झाकली मुठ सव्वा लाखाची, असू द्या.
पुढे संजय राऊत म्हणाले, आणि हे परत सांगतो, हे काय मला जेलमध्ये टाकतील. माझ्या पक्षासाठी मी हिंमतीने जेलमध्ये गेलोय. आम्ही शरणागती पत्करली नाही. आम्ही नामर्द नाही, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. तुम्ही कायद्याचे बाप झालात का? कोणकोण मला जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहे याची नोंद मी ठेवली आहे. नारायण राणेंनी आम्हाला धमक्या देऊ नये. त्यांचे घोटाळे बाहेर काढले तर त्यांना 50 वर्षे जेलमध्ये राहावे लागेल. असा ईशाराही संजय राऊत यांनी दिला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम