जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि.तरफे कार्यशाळा व सहकार मेळावा संपन्न

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 19 सप्टेंबर 2022 | सरदारवल्लभ भाई पटेल सभागृहात दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. तर्फे जळगाव तालुक्यातील सहकारी बँक व सहकारी संस्था यांच्यासाठी दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संचालिका सौ. जयश्री सुनील महाजन यांनी पुढाकार घेऊन कार्यशाळा व सहकार मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्यात दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या अंतर्गत येणाऱ्या सहकारी बँक व संस्था यांना योग्य मार्गदर्शन देण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. चे चेअरमन मा. आप्पासो. श्री गुलाबरावजी देवकर, कार्यक्रमाचे उदघाटक दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. चे व्हा. चेअरमन मा. भाऊसो. शामकांतजी सोनवणे, प्रमुख अतिथी व मार्गदर्शन विरोधी पक्ष नेते जळगाव शहर महानगरपालिका व संचालक कृ. उ. बा . समिती, जळगाव.

श्री. सुनीलभाऊ महाजन व शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन तसेच मंचावर संचालक श्री. रवींद्रभैया पाटील, श्री. श्रीकांत झांबरे, श्री. जितेंद्र देशमुख, श्री. संतोष बिडवई, श्री. एम. टी. चौधरी, श्री. विलास गावडे यांच्यासह मेळाव्याला बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम