हृदयाचा ठोका चुकविणारा तरुणाचा स्टंट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ जुलै २०२३ ।  जगातील अनेक लोक धाडसी असतात. जे अनेक धाडसी, अॅडव्हेन्चरस गोष्टी करतात. त्यांचे व्हिडीओ, फोटो इंटरनेटवर नेहमीच समोर येत असतात. एकापेक्षा एक विचित्र, भयानक, धोकादायक स्टंट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

असाच एक स्टंट व्हिडीओ सध्या समोर आलाय. जो पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. बाईक स्टंट गेम सुरु असतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये दोन व्यक्ती धोकादायक बाईक स्टंट करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन व्यक्ती जमिनीवरून बाईक चालवत हवेत उडी मारताना दिसत आहे. त्यानंतर त्याचे शरीर दुचाकीपासून पूर्णपणे दूर होते. हळू हळू ते पुन्हा बाईकवर बसू लागतात आणि परत जमिनीवर येतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल आणि हृदयाचे ठोके वाढतील. हा खतरनाक स्टंट सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम