
श्री बागेश्वर धाम सेवा समिती जळगाव जिल्ह्याच्या सहसंयोजकपदी सागर पाटील यांची नियुक्ती
प्रदेश संयोजक अभिजीत गुलाबराव करंजुले-पाटील यांनी दिले नियुक्ती पत्र
श्री बागेश्वर धाम सेवा समिती जळगाव जिल्ह्याच्या सहसंयोजकपदी सागर पाटील यांची नियुक्ती
प्रदेश संयोजक अभिजीत गुलाबराव करंजुले-पाटील यांनी दिले नियुक्ती पत्र
जळगाव I प्रतिनिधी
श्री बागेश्वर धाम सरकारचे पिठाधिश प.पु. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने आपली श्री बागेश्वर धाम सेवा समिती जळगाव जिल्ह्याच्या सहसंयोजकपदी सागर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीबाबतचे पत्र अभिजीत गुलाबराव करंजुले-पाटील (प्रदेश संयोजक) श्री बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समिती यांनी दिले आहे.
सनातन धर्माच्या रक्षणाचे आणि हिंदू जनजागृतीचे हे उदात्त कार्य आपण सर्वांना सोबत घेऊन अधिक उंचीवर घेऊन जाल अशी आशा आहे. ही जबाबदारी आपण कठोर परिश्रमाने यशस्वीपणे पार पाडाल असा मला विश्वास असल्याचे प्रदेश संयोजक अभिजीत गुलाबराव करंजुले-पाटील यांनी नियुक्ती पात्रात म्हटले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम