
जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची निवडणूक रोहित निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध
बॅरीस्टर निकमांचा वारसा यशस्वी
जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रोहित निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध
बॅरीस्टर निकमांचा वारसा यशस्वी
जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जिल्हा दूध संघाचे संचालक रोहीत दिलीपराव निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली.बिनविरोध निव
डणूक होण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीष महाजन,पाणी पुरवठामंत्री व जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील,वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे,पदमश्री ॲड.उज्वल निकम,
रोहित निकम यांचे वडील दिलीपराव निकम यांनी देखील सहकारात वर्चस्व सिध्द केले होते.आई शैलेजा देवी निकम या जिल्हा बॅंकेच्या संचालिका असुन सहकारातील केंद्र व राज्याची अनेक पदे त्यांनी भूषविले आहे. जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी रोहित निकम यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध झाल्याने विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सहकार व पणन क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यातील पहिली व सातत्याने ‘अ’ वर्गात असलेली संस्थेची स्थापना १९५६ मध्ये झाली. या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी प्रत्येक समाजाला स्थान देवून सहकारात समन्वयाचा नविन आदर्श उभा केला आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढील प्रमाणे रोहित निकम,संजीव मुकुंदराव पाटील,रमेश जगन्नाथ पाटील,यादवराव विष्णू पाटील,रामनाथ चिंधु पाटील,सुधाकर दौलतराव पाटील,मंगेश भरत पाटील,शांताराम चंद्रा सोनवणे,श्वेतांबरी रोहित निकम,सोनल संजय पवार,अरूण बाबुराव देशमुख,गजानन मल्हारराव देशमुख,प्रशांत लिलाधर चौधरी,विवेक राजाराम पाटील,अरविंद भगवान देशमुख,निळकंठ आनंदा नारखेडे,पुंडलीक दौलत पाटील,प्रताप हरी पाटील,अरूण आत्माराम पाटील यांची निवड झाली आहे.
तीन विविध पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या माघारी झाल्या जळगाव जिल्ह्यात सहकारात एक आदर्श पायंडा पडला असुन सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणजेच भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज,राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी निवडणुकीतून माघार घेत खऱ्या अर्थाने सहकारात राजकारणाचे जोडे बाजूला सारून खऱ्या अर्थाने राजकीय मुस्सदेगिरी दाखवली.
बॅरीस्टर निकमांचा वारसा यशस्वी
कृषी,औद्योगिक सहकारी संस्थेंचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी बॅरीस्टर देवराम माधवराव निकम यांचे नातु रोहित दिलीपराव निकम यांनी गेल्या जळगाव जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत सुद्धा मोठी कामगिरी बजावली होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम