जळगावातील त्रिमुर्ती महाविद्यालांचा देशात डंका ; विद्यार्थ्यांचे मोठे यश

त्रिमुर्ती फार्मसी महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट मानांकन व GPAT 2023 परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ ऑगस्ट २०२३ | जळगाव शहरापासूननजीक असलेल्या पाळधी येथील नामांकित फार्मसी क्षेत्रातील शिक्षण संस्था त्रिमुर्ती फार्मसी येथील बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी “GPAT 2023″ परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने देशात त्रिमुर्ती फार्मसी महाविद्यालयाचा डंका वाजलेला आहे. या परीक्षेत आदित्य जितेंद्रसिंग परदेशी याने ऑल इंडिया रैंक 51 वा नंबर मिळवला व अजून 8 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष श्री मनोज पाटील सर यांनी अभिनंदन व कौतुक केले. अध्यक्ष श्री. मनोज पाटील सर म्हणाले दरवर्षी या परीक्षेत आपले विद्यार्थी चमकत असतात १००% सुविधा दिल्या तर यश नक्की मिळते हेच आपली संस्था साध्य करीत आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी अध्यक्ष श्री. मनोज पाटील सरानी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ. अंकुर जैन, उपप्राचार्य श्री. निलेश पाटील उपस्थित होते. तसेच २०२२-२३ च्या सर्वेक्षणात त्रिमुर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला सर्वोत्कृष्ट मानांकन मिळवुन दरवर्षीप्रमाणे आपला दबदबा कायम ठेवला हे मानांकन दरवर्षी मिळणे म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे असे अध्यक्ष श्री मनोज पाटील सर म्हणाले भविष्यात ही असेच मानांकन ठेवू असे सर म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम