युवराज दादा पाटील यांची ‘दै. बातमीदार’च्या सहसंपादकपदी निवड

नियुक्तीबद्दल तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वत्र आनंद

बातमी शेअर करा...

युवराज दादा पाटील यांची ‘दै. बातमीदार’च्या सहसंपादकपदी निवड
नियुक्तीबद्दल तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वत्र आनंद
जामनेर प्रतिनिधी

तालुक्यातील आमखेडा (देवीचे) गावाचे माजी सरपंच व प्रगतिशील शेतकरी युवराज बाबुराव पाटील यांची ‘दै. बातमीदार’ या वृत्तपत्राच्या सहसंपादकपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

युवराज पाटील हे दत्ता भाऊ काकडे प्रणित सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे जिल्हा समन्वयक तसेच जामनेर तालुक्याचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी सरपंचपदाच्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीला तालुक्यातील इतर मान्यवरांकडून भरघोस पाठिंबा मिळत आहे.

युवराज पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच, त्यांच्या मित्रपरिवारासह आप्तांनीही या नियुक्तीचे अभिनंदन केले आहे. गावाच्या विकासासाठी ते सातत्याने कार्यरत राहतील, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम