चीन ,उत्तर कोरियाच्या मुकाबल्यासाठी आता जपान उचलणार शस्त्र

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार I १८ डिसेंबर २०२२ I दुसऱ्या महायुद्धात पाेळल्यानंतर शांततेच्या मार्गावर गेलेला जपान लष्करी सामर्थ्य वाढविणार आहे. तेथील सरकारने तब्बल ३५ हजार काेटी डाॅलर्स रकमेची शस्त्रास्त्रखरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे सर्वात माेठे कारण आहे चीन आणि उत्तर काेरियाचा वाढता धाेका.

जपानचे पंतप्रधान फुमियाे किशिदा यांनी नवी राष्ट्रीय सुरक्षा याेजना जाहीर केली. त्यानुसार संरक्षण क्षेत्रासाठी एकूण जीडीपीच्या २ टक्के खर्च करण्यात येणार आहे. हा आकडा दुपटीने वाढविला आहे. किशिदा यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात यामागील भूमिका मांडताना सांगितले, की आजूबाजूचे वातावरण अस्थिर हाेत आहे. त्यामुळे आणीबाणी आणि विशिष्ठ परिस्थितीमध्ये दुसऱ्या देशावर थेट हल्ला करण्यासाठी आपण सक्षम व्हायला हवे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम