‘जवान’ चित्रपट केवळ ६० रुपयात !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ सप्टेंबर २०२३ | गदर २ नंतर बॉलिवूडचा ‘बादशाह’ असलेल्या शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण त्याचा आगामी चित्रपट ‘जवान’ आहे, जो 7 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ‘पठाण’ चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर बंपर कलेक्शन करणाऱ्या शाहरुखला ‘जवान’कडून मोठ्या अपेक्षा आहेत. साऊथ बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करता यावी यासाठी त्यांनी हा चित्रपट संपूर्ण भारतामध्ये डिझाइन केला आहे. या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. शारूहख खानचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ॲडव्हान्स बुकिंग करत आहेत.

शाहरूख खान जवान‘च्या माध्यमातून त्याला त्याच्या ‘ पठाण‘ चित्रपटाचा रेकॉर्डही मोडायचा आहे. त्यामुळेच हा चित्रपट दक्षिणेत लोकप्रिय व्हावा यासाठी तिथल्या चित्रपटांतील सुपरस्टार्सना कास्ट करण्यात आले आहे. यात विजय सेतुपती, नयनतारा आणि प्रियामणी यांची नावे प्रमुख आहेत. शाहरूखच्या ‘जवान’ चित्रपटाचे भारतात देखील ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. दिल्लीत या चित्रपटाने 2.5 कोटी रूपये तर मुंबईत 1.5 कोटी कमवले आहेत.

काही ठिकाणी या चित्रपटाचे तिकिट 2 हजार रूपये आहे. पण भारतात काही अशी चित्रपट गृह आहेत जिथे ‘जवान’चे तिकिटे 100रुपयांपेक्षा कमी आहे. भारतातील कोलकात्याच्या बारासात येथील चित्रपटगृहात खुप कमी पैसे देऊन तिकिटे मिळत आहेत. तिथे बाल्कनीतील तिकिटांची किंमत केवळ ८0 रुपये आहे. तर कोलकात्यातील पद्मा आणि बारापूर चित्रपटगृहातही ‘जवान’ची केवळ 60 रुपयांना तिकिट प्रेक्षकांना भेटत आहे. बसुश्री चित्रपटगृहामध्ये 100 आणि 150 रुपयांना तिकिट प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे. तसेच, मुंबईतील डोंगरी भागातील प्रमियर गोल्ड चित्रपटगृहात खूप कमी किंमतीत तिकिटे मिळत आहे. या चित्रपटगृहात स्टॉल सीट्सची तिकिटे 100 रुपये आहे. ड्रेस सर्कल सीट्सची तिकिटे 112 रुपयांमध्ये विकली जात आहेत. तर चैन्नईतील एजीएस चित्रपटगृहामध्ये केवळ 63 रुपयांमध्ये ‘जवान’ची तिकिटे विकण्यात येत आहेत. दिल्लीतील शक्ति नगर परिसरातील अम्बा चित्रपटगृहांमध्ये केवळ 75 रुपयाला ‘जवान’ची तिकिटे मिळत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम