राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भव्य रंगभरण स्पर्धा संपन्न

बातमी शेअर करा...

पारोळा येथील मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भव्य रंगभरण स्पर्धा भुईकोट किल्ला येथे घेण्यात आली.कार्यक्रमाची सुरूवातीला जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष अन्नपूर्णा पाटील व जिल्हा संघटक वैशाली पाटील व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.उत्तरा शिंदे , हर्षदा बेलेकर यांनी जिजाऊ वंदना म्हटली तर बाल शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत रूद्र चौधरी आणि साक्षी चौधरी मॉंसाहेब जिजाऊ च्या वेशभूषेत होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.जे‌.बी.पाटील यांनी केले.सदर रंगभरण स्पर्धा तीन गटात घेण्यात आली.एकशे पस्तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला.सदर स्पर्धा आयोजन व यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ.शांताराम पाटील, महेश पाटील,पतंगराव पाटील, रविंद्र पाटील, डॉ.योगेंद्र पवार, सतिश माने, मनोहर पाटील,प्रतिक मराठे,देविदास सोनवणे, निलेश पाटील, गोविंद टोळकर, सुभाष महाले,सुवर्णा पाटील, रोहिणी फंड तसेच शितल अकॅडमीचे शिक्षक यांनी सहकार्य केले.सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवजयंतीच्या दिवशी करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम