नवीन वर्षात तरुणांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ डिसेंबर २०२२ । यंदाचे वर्ष जर तुम्ही नोकरी शोधण्यात गेले असेल तर येणारे वर्ष तुमच्यासाठी नोकरी घेवून येईल. जे तरूण नोकरी शोधत आहेत. त्यांच्यासाठी हि बातमी फार महत्वाची आहे. नव्या वर्षात टपाल विभागात 98 हजार जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या आखत्यारित भारतीय टपाल विभागाने देशभरात तयार केलेल्या विविध मंडळांच्या अंतर्गत कार्यालयांसह कार्यरत 1 लाख 50 हजारांहून अधिक मुख्य आणि सामान्य पोस्ट ऑफिसमध्ये विविध वेतन-श्रेणीच्या रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.

दरम्यान रेल्वे, पोस्ट, बीएसएनएल या सरकारी विभागांशी असलेले नागरिकांचे नाते जिव्हाळ्याचे आहे. जुन्या पिढीच्या अत्यंत जिव्हाळ्याचं असणारी ही खाती नव्या पिढीलाही आपलाशी वाटतात. टपाल विभागाने काळानुसार स्वत:मध्ये बदल केल्यामुळे हा विभाग जिवंत आहे. मात्र, मनुष्यबळाची कमतरता, वाढलेली कामे यामुळे कर्मचाऱ्यांवर भार पडत असल्याचे चित्र आहे. याचपार्श्वभूमीवर पोस्ट विभागात रिक्त असलेल्या 98 हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज आणि भरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट रिक्रूटमेंट 2023 च्या संधींची वाट पाहणारे उमेदवार या वेबसाइटच्या भरती विभागात सक्रिय केलेल्या लिंकवरून इंडिया पोस्ट 98 हजार रिक्त जागा अधिसूचना PDF डाउनलोड करू शकतील. भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी टपाल विभागाचे संकेतस्थळ तपासावे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम