मैत्रीमधील मस्करी पडली महागात ; मित्रावर अनैसर्गिक अत्याचार करीत व्हीडीओ केला व्हायरल !
दै. बातमीदार । १४ डिसेंबर २०२२ । मित्र एकत्र आले कि कोणती मस्करी करीत हे सांगता येत नसते पण कधी कधी हि मस्करी सुद्धा खूप महागात पडत असते. ज्यामधून एखाद्या मित्राला त्रास होवून दुर्देवी घटना हि घडू शकते अशीच एक धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे घडल्याने मैत्री या गोड शब्दाला काळिमा फासला गेला आहे.
तीन मित्र एकत्र येत मस्करी सुरु असतांना एकाने आरोपीने अचानक आपल्या सोबत असलेल्या मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे दुसऱ्या एका मित्राने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरुन दोन जणआंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 वर्षीय वासनांध तरूणाने 19 वर्षीय तरूण मित्राला दारू पाजून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील बाभळी परिसरात घडली. तिथं उपस्थित तिसऱ्या मित्राने त्या अनैसर्गिक शरीरसंबंधाचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं. इतक्यावरच हे आरोपी थांबले नाहीत, त्यांनी हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल देखील करण्यात आला. त्या व्हायरल व्हिडिओची दखल घेत दर्यापूर पोलिसांनी 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. अत्याचाराचा हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर शेअर करण्यात आला. बघता बघता हा शेकडो लोकांपर्यंत व्हिडिओ फॉरवर्ड झाला. त्यामुळे त्या तरुणांची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मित्रानेच मित्रावर केलेल्या अत्याचाराच्या या धक्कादायक घटनेची चर्चा संपुर्ण दर्यापुरात होत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम