समाज कल्याण विभागात पत्रकार कार्यशाळा
दै. बातमीदार I ५ डिसेंबर २०२२ I सामाजिक न्याय व विशेष सहाय्य् विभागामार्फत समता पर्वाच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे सहाय्यक आयुक्त, यांच्या उपस्थितीत दिनांक 1 डिसेंबर, 2022 रोजी जिल्हयातील पत्रकारांची कार्यशाळा संपन्न झाली .
समाज कल्याण विभागाच्या वतीने दिनांक 26 नोव्हेंबर 2022 ते 6 डिसेंबर, 2022 या दरम्यान समता पर्व साजरा केला जात आहे. त्या दरम्यान पत्रकारांना सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर कार्यशाळा आयोजित करुन सहाय्यक आयुक्त श्री. योगेश पाटील यांनी समाज कल्याण विभागात होणाऱ्या नवनवीन बदलांची माहिती दिली. यामध्ये संवाद उपक्रम, मिशन काबील, ऊसतोड कामगार, तृतीयपंथीय, स्वाधार योजना अशा विविध योजनांची माहिती पावर पॉईट प्रेझेंटन व्दारे समाज कल्याण विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तसेच समाज कल्याण जिल्हा परिषद विभागाची विभागात विविध योजनांची माहिती भरत चौधरी वैद्यकीय सामाजिक कर्यकर्ता यांना दिली. सदर कार्यक्रमास पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम