
कडबा कुट्टी मोटार चोरी तपासात, मोटर सायकल चोरी रॅकेट उघड
भडगाव/प्रतिनिधी
गुढे गावातील कडबा कुट्टी मोटार चोरी प्रकरणात काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता चौकशीत दुचाकीही चोरी रॅकेट चा पर्दाफाश झाला आहे. त्यांच्यां कडुन तीन दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
तालुक्यातील गुढे येथील शेतकरी दिलीप देवीदास पाटील यांच्या शेतातून कडबा कुट्टीची मोटार चोरीला गेल्याची तक्रार भडगाव पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरली असता यात गावातील काही जण असल्याची गुप्त माहिती वरून पोलिसांनी गुढे गावातील अनिल ज्ञानेश्वर चव्हाण, प्रदिप रणजित कोळी, संतोष नाना महाले व समाधान संतोष ढोले रा. बहाळ ता. चाळीसगांव अशांना ताब्यात घेतले. अटकेमध्ये दिलीप देवीदास पाटील रा. गुढे ता. भडगांव यांची चोरीस गेलेली मोटार पोलीसांना मिळुन आली. सखोल तपास केला असता गावातील अजून चोरीच्या मोटर सायकल काही संशयितांकडे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना मिळाली. त्यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सफौ पांडुरंग सोनवणे, पोना निलेश ब्राम्हणकर, पोना एकनाथ पाटील यांनी गुढे गावातील संशयित इसम भुषण (प्रशांत) ज्ञानेश्वर महाजन, भुषण अनिल भावसार, सर्व रा. गुढे ता भडगांव यांचेकडे मोटार सायकलच्या गुन्हयांची चौकशी केली असता त्यांनी अटकेत असलेला संतोष नाना महाले याचेसह मिळुन नाशिक सह चाळीसगांव येथे मोटार सायकलची चोरी केली असल्याचे कबुली दिली. तसेच चोरलेल्या मोटार सायकल ज्यात एक होंडा कंपनीची युनिकॉर्न व दोन बजाज प्लाटीना अशा मोटार सायकल पोलिसांना मिळून आल्या.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भडगांव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सफौ पांडुरंग सोनवणे, पोना/ निलेश ब्राम्हणकर, पोना एकनाथ पाटील यांनी केली आहे. पुढील तपास पोना एकनाथ पाटील हे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम