कजगाव ग्रामपंचायत मालकीच्या जागेतून गौण खनिजाची परवानगी द्या : सरपंच व सदस्यांचे तहसीलदारांना निवेदन

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

कजगाव ग्रामपंचायत हद्दीत गावातील अनेक रस्ते अत्यंत खराब झाले आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करुन निधी मंजूर केला तसेच टेंडर सुद्धा मंजूर केले परंतू या रस्त्यांसाठी गौण खनिज नसल्याने रस्त्यांचे कामे रखडलेले असून रॉयल्टी भरून गौण खनिजाची परवानगी द्यावी असे निवेदन कजगाव ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी आज भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,
शासकीय यंत्रणेने मौजे कजगाव येथील रस्ते विकसित करण्याकरीता मंजुरी दिलेली आहे. सदरचे रस्ते विकसित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचे काम एम एस.एस.प्रा.लि कंपनी यांना दिले असून काम करण्यासाठी कायदेशीर रॉयल्टीची रक्कम घेऊन मौजे कजगाव ग्रामपंचायत मालकीच्या जागेतून गौण खनिजाची परवानगी द्यावी. शासनाने कजगांव ता. भडगांव येथील गावातील अनेक रस्ते अत्यंत खराब झाल्यामुळे, सदरचे रस्ते विकसित करण्याकरिता निधी मंजुर होऊन टेंडर पास होऊन, संबंधित अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर २०/०६/२००३ रोजी कॉन्ट्रक्टर यांना दिलेली आहे परंतु आपल्या कार्यालयामार्फत गौणखनिज वाहतुक परवाना मिळत नसल्यामुळे गावातील रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नाहीत आणि पावसाळयाचे दिवस असल्यामुळे आणि रस्त्यांची जागा काळी मातीची असल्यामुळे जुन्या रस्त्यांवर खड्डे निर्माण झालेले आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण गावाच्या लोकांना पाई चालने देखाल शक्य होतनसल्याने शासकीय परवानगी दिल्यानंतर देखील आपल्याकडुन व या आदेशाने पालन झालेले नाही व आपण परवाना देत नसल्यामुळे कजगाव पुर्ण ग्रामस्थ त्रस्त झालेले आणि अशा प्रकारे कजगाव गावातील ग्रामस्थांवर अन्याय केला जात आहे.

या अन्याय संदर्भात ग्रामपंचायत कजगाव व ग्रामस्य कजगाव यानी एकत्र येवून, सभेमध्ये निर्णय घेऊन गावातील रस्ते विकसित करणेकरीता आपल्याकडुन गौणखनिज परवाना मिळाला पूर्ण कजगाव गावातील ग्रामस्थ कजगांव येथील बस स्टॅन्ड ते चाळीसगाव गाव रस्त्यावर दि. १३/०७/२०२३ रोजी सकाळी १०.०० योजेच्या सुमारास रस्तारोको आंदोलन करणार करण्यात येणार आहे. असे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनावर सरपंच रघुनाथ महाजन, सदस्य पुंडलिक सोनवणे, अक्षय मालचे,सादिक गणी, कविता महाजन, सौ.अंजना सोनवणे सौ.वैशाली हिरे,समाधान पवार, स्विटी धाडीवाल , सौ.पल्लवी पाटील ,सत्यभामा कोळी, मंगिलाल बोरसे , शोभाबाई बोरसे , यांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, पोलिस अधीक्षक जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव, उपविभागीय अधिकारी पाचोरा, पोलिस निरिक्षक भडगाव यांना देण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम