कालीचरण महाराज लवकरच जेलमध्ये जाणार ; इम्तियाज जलील !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ मे २०२३ ।  राज्यातील एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि कालीचरण महाराज यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असतांना दिसून आले आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जलील आणि कालीचरण महाराज दोन्ही असताना त्यांनी एकमेकांवर टीका केली आहे.

कालीचरण महाराज लवकरच जेलमध्ये जाणार असल्याची टीका इम्तियाज जलील यांनी केली होती. तर त्यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना, “हाती चले बजार, कुत्ते भोंके हजार” असे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे. त्यामुळे इम्तियाज जलील विरुद्ध कालीचरण महाराज असा नवा वाद पाहायला मिळत आहे.

इम्तियाज जलील यांची टीका…
अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जलील यांनी कालीचरण महाराज यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, कोणीपण भगवा कपडा घालून महाराज होण्याचा प्रयत्न करतोय पण तसे होत नाही. अनेक गुन्हेगार भगवे कपडे घालून स्वतःला स्वामी म्हणून घेण्याला सुरुवात केली आहे. काही महाराज तोंड उघडलं की विष ओकतात. आसारामबापू यांचे किती चाहते होते. ते आल्यावर लाखो लोकं त्यांच्या मागे असायचे, पण आज ते जेलमध्ये आहेत. कालीचरण महाराज देखील किती दिवस बाहेर असतील मला माहित नाही, पण अशाप्रकारे असलेल्या महाराजांची जागा जेलमध्ये असणार आहे. मात्र जेव्हा पोलीस, सरकार , प्रशासन सक्तीने कायद्याचा वापर करतील त्यावेळी हे सर्व काही शक्य आहे. तसेच कालीचरण महाराज यांच्या भाषेत आम्ही देखील उत्तर देऊ शकतो, असेही जलील म्हणाले.

कालीचरण महाराज यांचे प्रत्युत्तर…
दरम्यान, जलील यांच्या टीकेला कालीचरण महाराज यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. “मला काय देणघेणं या लोकांशी. मी तुकडा टाकला की, लगेच भूकंतात. हाती चले बजार, कुत्ते भोंके हजार या नीतीने आम्ही चालत राहतो. कोणी निंदा कोणी मिंदा, आमचा सत्य सांगण्याचा धंदा असे कालीचरण म्हणाले. त्यामुळे जलील आणि कालीचरण महाराज यांच्यातील आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम