कमल हासनचे भारत जोडो यात्रेबाबत मोठ विधान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ जानेवारी २०२३ । भारत जोडो यात्राने जगभरात आपली छाप सोडली आहे. ७ सप्टेंबर २०२२ मध्ये तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथून सुरु झालेली भारत जोडो यात्रा ३० जानेवारी २०२३ पर्यंत सुरु असणार आहे. ३० जानेवारी रोजी भारत जोडो यात्राची सांगता जम्मू-काश्मिर येथील श्रीनगर याठिकाणी होणार आहे. यावेळी राहूल गांधी राष्ट्रीय ध्वज फडकावत यात्रा समाप्त करणार आहेत. या यात्रेत साऊथचे दिग्गज स्टार कमल हासन देखील सहभाग नोंदवला होता.

भारत जोडो यात्रेमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी झाले. एवढंच नाही, तर अनेक कलाकार देखील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. आता साऊथचे दिग्गज स्टार कमल हासन देखील राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला आहे. शियाव यावेळी कमल हासन यांनी त्यांच्या निर्णयाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

यात्रे दरम्यान कमल हासन म्हणाले, ते एकजूट भारतासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रेत कमल हासन सहभागी झाल्यानंतर कोणत्याही पक्षाच्या दिशेने झुकले आहेत, अशा दृष्टीने पाहू नये असं हासन यांनी सांगितलं. कमल हासन पुढे म्हणाले, ‘ राजकारणाची समज असती तर १९७० मध्ये लागू करण्यात आलेल्या आणिबाणीच्या दरम्यान राजधानीच्या रस्त्यांवर उतरलो असतो.’ एवढंच नाही तर, यावेळी कमल हासन सर्वांनी विनंती करत म्हणाले, ‘माझ्या निर्णयाला कोणत्याही पक्षाच्या दिशेने झुकल्याचं पाउल समजू नका. एकजूट भारतासाठी मी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. सध्या कमल हासन यांचे भारत जोडो यात्रेमधील राहूल गांधी यांच्यासोबत फोटो व्हायरल होत आहेत.

‘माझ्यामध्ये प्रचंड राग आहे. म्हणून मी राजकारणात प्रवेश केला. ज्या लोकांनी माझ्यावर ६ दशकांपासून प्रेम केलं त्यांच्यासाठी आणि समाजासाठी काम करण्यासाठी मी राजकारणात पाऊल ठेवलं आहे. कोणत्या गोष्टीचा माझ्यावर प्रभाव पडण्याआधी मला राजनीतीवर माझा प्रभाव पाडायचा होता. म्हणून राजकारणात प्रवेश केल्याचं कमल हासन यांनी सांगितलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम