कावपिंप्रीत 80 लक्ष निधीतून झाले पुलाचे निर्माण… -आ.अनिल पाटलांच्या हस्ते झाले थाटात लोकार्पण,1 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचेही भूमिपूजन…

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख) मतदारसंघातील कावपिंप्री येथे आ.अनिल पाटील यांच्या अथक प्रयत्नाने 04 योजनेंतर्गत 80 लक्ष निधीतून नाल्यावर मोठ्या पुलाचे निर्माण झाल्याने या कामाचे थाटात लोकार्पण आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,याच वेळी जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटींची पाणीपुरवठा योजना आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

ग्रामस्थांच्या वतीने सदर पुलाचा लोकार्पण सोहळा आणि विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता,आमदार अनिल पाटील यांचे गावात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले,त्यानंतर त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला,यावेळी मनोगत व्यक्त करताना आ पाटील म्हणाले की येथील ग्रामस्थांना गावातून इकडून तिकडे जाताना नाल्याचा अडसर असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत होती आपण ही समस्या मनावर घेऊन येथे नेशनल हायवेवर असतो तसाच रुंद व मोठा पूल साकरल्याने ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे,या गावात पाणीटंचाई ची समस्या भेडसावत असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपणास सांगितल्याने गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत 101 लक्ष ची योजना आपण मंजूर केली असून त्याचे भूमिपूजन आज होत असल्याचे समाधान आपल्याला आहे,या गावाने आपणास भरभरून दिले असल्याने आपणही भरभरून देण्याचा प्रयत्न करीत असून आज भूमिपूजन होत असलेल्या सर्व विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यासाठी लवकरच गावात येईल अशी ग्वाही आमदारांनी दिली.यावेळी 2515 अंतर्गत 10 लक्ष निधीतून काँक्रीट रस्ता तयार करणे,आमदार निधीतून 15 लक्ष निधीतून अनुसूचित जमातीसाठी समाजमंदिर बांधणे आणि डी. सी.पी.अंतर्गत 40 लक्ष निधीतून मराठी शाळेला वॉलकंपाऊंड करणे आदी कामांचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी मा.सरपंच प्रविण पाटील, सरपंच धर्मेंद्र पाटील,, उपसरपंच सुनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य. छायाबाई पाटील, वि.का.सो. चेअरमन मनोहर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पोलिस पाटील प्रविण सोनवणे, मा सरपंच वल्लभराव पाटील,सुनिल पाटील, रामदास पाटील,डॉ. जिजाबराव पाटील, मालोजी पाटील, मोहन पाटील, अनिल पाटील, ईश्वर पाटील, भरत पाटील, छगन पाटील, दगडू सोनवणे, संजय पाटील, देविदास पाटील, छोटू वाणी अनिल भिल, सुनिल भिल, सुखदेव भिल, संजय सोनवणे, संजय भिल,भगवान पाटील, भूषण सोनवणे,नितिन सोनवणे, अमृत सोनवणे, अजय सोनवणे, शिवदास सोनवणे, वाल्मिक ठाकरे, शालीक ठाकरे, भानुदास भिल तसेच सर्व ग्रामस्थ मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान पुलाचा कठीण प्रश्न सोडविल्याने आणि पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गावात मोठी पाणीपुरवठा योजना दिल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम