कपिल सिब्बलांचे मोठे वक्तव्य ; राहुलच्या शिक्षेवर मांडले मत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ मार्च २०२३ ।  देशात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, न्यायालयाने राहुल गांधी यांना तात्काळ जामीन मंजूर केला आणि उच्च न्यायालयात जाण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली.

मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यांना जामीनही मंजूर झाला आहे. पण यामुळं त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते अशी चर्चा आता सुरु झाली आहे. दरम्यान, ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांना मोठं वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे ते खासदार म्हणून अपात्र ठरले आहेत.

दरम्यान या प्रकरणी कायदेशीर दिग्गज आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासासह खासदार म्हणून आपोआप अपात्र ठरवले जाते, ही शिक्षा विचित्र आहे. राहुल गांधी संसद सदस्य म्हणून कायदेशीररित्या अपात्र आहेत. न्यायालयाने केवळ शिक्षेला स्थगिती दिली तर ते पुरेसे नाही. दोषसिद्धीला स्थगिती असली पाहिजे. दोषसिद्धीला स्थगिती दिली तरच ते राहुल गांधी संसदेचे सदस्य राहू शकतात. असं मोठं वक्तव्य सिब्बल यांनी केलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम