‘या’ चित्रपटासाठी कार्तिकने वाढवले १४ किलो वजन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० नोव्हेबर २०२२ अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी ‘फ्रेडी’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कार्तिकच्या चाहत्यांना चित्रपटाचा टिझर आवडला आहे. या चित्रपटासाठी कार्तिकने खूप मेहनत घेतली असल्याचे समजते. तर त्याने बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केल्याचे वृत्त आहे. कार्तिकचे त्याच्या सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरने कौतुक केले आहे. बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी कार्तिकने कोणते रुटीन फॉलो केले, त्याबद्दल त्याने सांगितले आहे.

कार्तिकच्या फिटनेस ट्रेनरने खुलासा केला की, ‘फ्रेडीमधील भूमिकेसाठी कार्तिकला सुमारे 14 किलो वजन वाढवण्याची गरज होती. जेव्हा त्याला याची माहिती मिळाली तेव्हा त्याने अत्यंत कडक नियम आणि डाएट प्लॅनचे पालन करत काही दिवसांतच आपले वजन वाढवले ​​होते.’

वजनाबद्दल बोलताना कार्तिक म्हणाला होता, ‘माझ्यासाठी फ्रेडीचे पात्र सर्वात रंजक आणि आश्चर्यकारक स्क्रिप्टपैकी एक आहे. या व्यक्तिरेखेसाठी मला वजन वाढवण्याची गरज आहे, हे पाहून मी इतर तयारींबरोबरच त्याची तयारीही सुरू केली. कारण हे पात्र साकारण्यासाठी मी खूप उत्सुक होतो.’

अलाया एफ ‘फ्रेडी’मध्ये एफ कैनाज नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. जी एक विवाहित स्त्री आहे जिचा नवरा तिला सतत अपमानित करत राहतो. कैनाज फ्रेडीच्या प्रेमात पडते. फ्रेडी कैनाजशी लग्न करण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारतो, त्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. कार्तिक आणि अलायाचा हा चित्रपट 2 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम