खा.अमोल कोल्हेंची मंथन शिबिरास दांडी? भाजपच्या संपर्कात?
दै. बातमीदार । ५ नोव्हेबर २०२२ गेल्या दोन दिवसापासून रुग्णालयात असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिर्डीमध्ये मंथन शिबीरास हजर राहिले पण पक्षाचे फायर ब्रँड नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनीच मंथन शिबिराकडे पाठ फिरवली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून खासदार कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता त्यांनी चक्क पक्षाच्या शिबीराकडेही पाठ फिरवल्याने ते नाराज असल्याच्या पुन्हा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आजारी असतानाही आज (५ नोव्हेंबर) या आजारपणातून उठून शिबिरात दाखल झाले. कालही त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शिबीराला संबोधित केले होते.
या शिबिरात कोल्हे हे हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांची कार्यपद्धती या विषयावर मांडणी करणार होते. पण पक्षातील कार्यपद्धतीवर कोल्हे नाराज असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली आहे. त्यात कोल्हे यांच्या अनुपस्थितीने अजूनच भर घातली आहे. यावरुन पक्षातील नेत्यांचं मौन बाळगल्याने वेगळेच तर्कवितर्क लावले जात आहेत.
असे असतानाच शस्त्रक्रियेमुळे कोल्हे यांनी शिबीराला अनुपस्थिती लावली, असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे त्यांची भाजपशी वाढती जवळीकही लपून राहिलेली नाही. दोन आठड्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अमोल कोल्हे यांनी त्यांची चित्रपटाच्या निमित्तानेही भेट घेतली होती. यावरुनही चर्चा रंगल्या होत्या.
त्यानंतही त्यांनी अमित शहा यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ट्विटरवरुन उपरोधिक शब्दांत टीका केली होती. ”माननीय केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पेट्रोल, डिझेलच्या किंमतींप्रमाणे तुमच्या वयाचे शतक पूर्ण करा. ज्याप्रमाणे खाद्यतेलांच्या किमती सतत वाढत आहेत, त्याचप्रमाणे तुमच्या कर्तव्याचा आलेखही वाढला पाहिजे, अशा शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम