खा.बापट यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ मार्च २०२३ ।  राज्यातील राजकारणाला चटका लावणारी बातमी काही वेळेआधी राज्यभर पसरली होती. या बातमीमुळे अगदी सर्वच पक्षातील नेत्यापासून ते कार्यकर्ते भावूक झाले होते. पुण्याचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं बुधवारी दीर्घ आजाराने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. गिरीश बापट यांच्यावर दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

आज सकाळपासून प्रकृती अधिकच ढासळली होती. अखेर गिरीश बापट यांनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्याच्या राजकारणातील चाणक्य अशी त्यांची ओळख होती. गिरीश बापट यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक ते खासदार असा त्यांचा प्रवास केला. गेल्या दीड वर्षांपासून ते रुग्णालयात दाखल होते. गिरीश बापट यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

गिरीश बापट यांची प्रकृती आज सकाळपासून अधिकच ढासळली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वसनाच्या आजार जडला. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर डायलिसिस सुरु होते. गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांच्या जाण्याने भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनानंतर आता लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

गिरीश बापट यांचे कसबा पेठ मतदारसंघात एकहाती वर्चस्व होते. गेली 25 वर्ष बापट आणि कसबा हे एकमेव समीकरण झाले होते. मतदार संघात काय चाललंय याची इतंभूत बातमी असायची. त्याचा उत्तम जनसंपर्क होता. बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. नगरसेवक ते खासदार अशी चढत्या क्रमाची कारकीर्द राहिली. 1995 पासून 5 वेळा आमदार म्हणून कसब्यातून निवडून आले. तर 2019 मध्ये खासदारपदी निवड झाली. कसब्याचे सध्याचे आमदार रवींद्र धंगेकरांना हरवून बापटांनी कसबा पेठ मतदारसंघ आपल्याकडे राखल होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम