अमृतसरमध्ये खलिस्तान समर्थक व पोलीसा भिडले ; पोलिसांना दिला 1 तासांचा अल्टिमेटम

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ फेब्रुवारी २०२३ । पंजाबमधील अमृतसर येथे आज सकाळी खलिस्तान समर्थक संघटना ‘वारीस पंजाब दे’ चा प्रमुख अमृतपालसिंग याच्या सांगण्यावरून साथीदाराच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. हजारोंच्या संख्येने व बंदुका, तलवारी, काठ्या हाती घेऊन पोलिस ठाण्याला घेराव घातला. पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावले. परंतू त्यांनी ते तोडून पोलिस ठाण्यात प्रवेश केला. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे.

अमृतपाल यानी गुरूवारी सकाळी 11 वाजता आपल्या समर्थकांना अजनाळा येथील पोलिस ठाण्याजवळ पोहोचण्यास सांगितले होते. यानंतर येथे गर्दी वाढू लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसही अधिक सक्रीय झाले. अमृतपाल पोहचण्यापूर्वीच त्याच्या समर्थकांना उचलण्यास सुरूवात झाली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

या घटनेची माहिती मिळताच अमृतपालनेही अजनाळा पोलीस ठाणे गाठले. येथे आल्यानंतर त्यांनी SSP सतींदर सिंह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तुफान सिंगला सोडण्यासाठी पोलिसांना 1 तासांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर तो पोलिस ठाण्याच्या बाहेर उभा आहे. यावेळी हजारो समर्थकांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला आहे. अमृतपाल त्याचा साथीदार तुफानसिंग याच्यासह एकूण 30 जणांविरुद्ध अमृतसरमधील अजनाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतपालविरोधात सोशल मीडियावर टीका करणाऱ्या तरूणाचे अपहरण केल्यानंतर या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी तुफानसिंगला अटक केली होती. यामुळे अमृतपाल संतप्त झाला. त्याने गुरूवारी अमृतरमधील अजनाळा पोलिस स्टेशनबाहेर निदर्शने करण्याची भूमीका घेतली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम