राणा फार्म हाऊस येथे महाशिवरात्री भक्तीभावात साजरी

महादेव मंदिरामध्ये भक्तीभावपुर्ण वातावरणात पुजा-अर्चा

बातमी शेअर करा...

राणा फार्म हाऊस येथे महाशिवरात्री भक्तीभावात साजरी
महादेव मंदिरामध्ये भक्तीभावपुर्ण वातावरणात पुजा-अर्चा
खामगाव :- महाशिवरात्रीच्या सणाला भारतीय संस्कृतीत अनन्य साध्ाारण महत्व असुन बुधवार दि.26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव देशभरात अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.महाशिवरात्रीनिमित्त सानंदा परिवाराच्या वतीने दरवष्ा प्रमाणेयाही वष्ा माक्ता-कोक्ता जवळील राणा फार्म येथील महादेव मंदिरामध्ये भक्तीभावपुर्ण वातावरणात पुजा-अर्चा करण्यात आली
.
राणा आनंदकुमार सानंदा व सौ.संदेशादेवी सानंदा यांच्या हस्ते ब्राम्हणवृंदांच्या उपस्थितीत मंत्रोपचारात महादेवाची पुजा व अभिष्ोक करण्यात आला. यावेळी समाजभुष्ाण राणा गोकुलसिंहजी सानंदा, माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, सौ.सवितादेवी सानंदा,माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा, माजी नगराध्यक्षा श्रीमती भारतीताई राजपुत, उद्योजक राणा राजेंद्रसिंह सानंदा, राणा मुकेशसिंह सानंदा,राणा सागरकुमार सानंदा, राणा अमेयकुमार सानंदा, राणा गौरवकुमार सानंदा,राणा दिग्वीजयसिंह सानंदा,राणा प्रतीक सानंदा यांच्यासह सानंदा परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सर्वाचे दु:ख,दारिद्रय नष्ट होवुन सर्वत्र सुख, शांती नांदावी व सर्वांच्या विध्ाायक मनोकामना पुर्ण व्हाव्या असे साकडे महादेवाच्या चरणी घ्ाातले व उपस्थितांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ओम नम: शिवाय, हरहर महादेव या जयघ्ाोषाने परिसर भक्तीमय झाला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम