गुढीपाडव्याच्या सणाला जाणून घ्या सोन्याचे दर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ मार्च २०२३ ।  हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष महत्व दिले आहे. त्यातील गुढीपाडवा हा नववर्षाच्या स्वागताचे एक प्रतिक आहे. त्यातच गुढीपाडव्याला सोनं खरेदी केली जाते. आजचा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात गर्दी होते. तुम्ही जर सोनं खरेदी करण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर चेक करा. एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 6,000 रुपये आहे. तर 8 ग्रॅम सोन्याचे दर 48,000 आणि 1 तोळे सोन्यासाठी आज ग्राहकांना 60,000 रुपये मोजावे लागणार आहेत.

काल मार्केट बंद होताना सोन्याचे दर उतरले होते. 1 तोळे सोन्याचा कालचा दर 59,780 रुपये होता. 22 कॅरेट सोन्याचे दर नेमके कसे आहेत? १ ग्रॅम 5,500 8 ग्रॅम 44,000 10 ग्रॅम 55,000 रिटेल बाजारात ९९९ शुद्धतेच्या सोन्याचे दर 57 हजार 888 रुपये झाले आहेत. तर 995 शुद्धतेच्या सोन्याचे दर 57 हजार 757 रुपये आहे. RTGS आणि GST पकडून ९९९ शुद्धतेच्या सोन्याचे दर 60 हजार155 रुपये झाले आहेत. तर 995 शुद्धतेच्या सोन्याचे दर 59 हजार 695 रुपये आहे.

मंगळवारच्या तुलनेत गुढीपाडव्याला म्हणजे आज 200 रुपयांनी सोन्याचे दर वाढले आहेत. गुढीपाडव्याला सोन्याला नवीन झळाळी मिळाली आहे. तर येत्या काळात म्हणजेच जुलै अखेरपर्यंत हेच दर 65 हजारापर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महिन्याभरात सोनं जवळपास अडीच हजार रुपयांनी वधारलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम