तुम्ही तुमची ताकद ओळखा ; राज ठाकरेंनी दिला सल्ला !
दै. बातमीदार । २३ जुलै २०२३ । राज्यातील राजकारणात कधी काय होणार याचा सध्याच्या परिस्थितीला बघता काहीच सांगू शकत नाही, सध्या देशातील केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादान केलेल्या विद्यार्थ्यांचा अनेक ठिकाणी सत्कार सुरु आहे. नुकताच तेजपर्व या संस्थेने प्रभादेवी येथे आयोजीत केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हा सत्कार झाला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
राज ठाकरे म्हणाले, तुम्हाला लोकशाहीची ताकद आता कळली असेल. ज्याला दहावीला 42 टक्के गुण पडलेला आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार करत आहे. राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मंत्रालयातील एक किस्सा सांगितला. “एकदा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर एक आयएएस अधिकारी मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत होते. तिथे सर्व जमले, पत्रकार देखील जमले. त्या अधिकाऱ्याला विचारलं तुम्ही मुख्यमंत्र्यांना शिव्या का घालत आहात. त्यावर तो अधिकारी म्हणाला असूदेत मी पर्मनंट आहे, ते टेम्पररी आहे. तुम्ही तुमची ताकद ओळखा”, असा आत्मविश्वास राज ठाकरे यांनी भावी अधिकाऱ्यांना दिला.
राज ठाकरे म्हणाले, “कुठेही गेलात तरी तुमच्या मनात महाराष्ट्राचा आदर असला पाहिजे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या राज्याबद्दल प्रेम असू शकतं तर तुम्हालाही असलं पाहिजे. पंतप्रधानांना वाटतं ना प्रत्येक गोष्टी गुजरातमध्ये गेल्या पाहिजेत. असं तुम्हाला वाटलं पाहिजे.”
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम