वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ कृषिदर्शनी व बेल वृक्षाचे वाटप
डॉक्टर दांपत्याचा अनोखा उपक्रम
चोपडा | प्रतिनिधी | तालुक्यातील तांदळवाडी येथील रहिवाशी असलेले डॉ. नरेंद्र पाटील व डॉ. सौ वैशाली पाटील, यांनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ पितृश्राद्ध वेळी पर्यावरणाचा संदेश देत कृषी दर्शनी व बेल वृक्षाच्या रोपांचे वाटप केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तांदळवाडी ता. चोपडा येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकर आनंदराव पाटील (आप्पा) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी 10 मे रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी केशरबाई ( सेवानिवृत्त अनुरेखक कृषी विभाग ), महेंद्र पाटील (मुलगा, जैन उद्योग समूहात सेवारत ह.मु.जळगाव), सौ. स्मिता पाटील (सून) डॉ. नरेंद्र पाटील( मुलगा ), डॉ. सौ वैशाली पाटील (सून ), 3 बहिणी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
तांदळवाडीतील पाटील परिवार यांचा 6 भाऊ व 2 बहिणी असा मोठा परिवार आहे. पाटील परिवार हा शेती व्यावसायिक असून खंडवा वाले धुनिवाले दादाजी यांचा भक्त परिवार म्हणून गणला जातो.
प्रभाकर आप्पा यांच्या मृत्यू पश्चात पाटील परिवारातील तसेच तालुक्यातील सुप्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. नरेंद्र प्रभाकर पाटील, संचालक – नवजीवन हॉस्पिटल, कन्या शाळेजवळ चोपडा तथा माजी वैद्यकीय अधिकारी उप जिल्हा रुग्णालय चोपडा, व डॉ. सौ वैशाली पाटील, स्त्री रोग तज्ञ हे उच्च विद्याविभूषित डॉक्टर दांपत्य, महेंद्र पाटील व सौ स्मिता पाटील यांनी पर्यावरणाचा संदेश देत 13 व्या दिवशी पितृश्राद्ध वेळी श्रीमद् भगवद् गीता या ग्रंथासोबतच महात्मा फुले कृषी विद्यापीठाची शेतकऱ्यांना मार्गदर्शक असलेली कृषिदर्शनी ही पुस्तिका भेट देत बेल वृक्षाच्या रोपांचे वाटप केले.
पाटील परिवाराने कृषिदर्शनी, बेल वृक्षाचे रोप वाटप करीत अध्यात्म, शेती व पर्यावरणाचे रक्षण यांचा सुवर्ण संगम साधत प्रथा परंपरेसोबत आधुनिकतेचा मिलाप केला आहे. बेल वृक्षांच्या रुपात कै. प्रभाकर आप्पांच्या स्मृती कायम राहतील. पाटील परिवाराचा हा उपक्रम म्हणजे कै. प्रभाकर आप्पांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे. पाटील परिवाराच्या या उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम