के आर शेख यांच्या बगदाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख) अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी कौसर रियाजोद्दीन शेख यांच्या दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी इराक येथील बगदाद शहरात रात्री ८ वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने जागेवरच निधन झाला
कौसर शेख हे शहरातील न्यु लक्ष्मी टाकी जवळील अनार अली मोहल्ला येथील रहिवासी आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीत जुनैद ट्रेडर्सचे संचालक व आमदार अनिल भाईदास पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात, हसनैन करीमैन‌ वेल्फेअर संस्थांचे संस्थापक अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती गुमास्ता कामागार युनियन चे अध्यक्ष ,सामाजिक आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक क्षेत्रात ही चांगली पकड होती शेख हे दिनांक २५ / १० / २०२२ ते १५ / ११ / २०२२ असे सोळा दिवसांचा मुंबई येथील अजमेरी टूर्स च्या माध्यमातून इराक देशात गेले होते दि १ नोव्हेंबर रोजी बगदाद शहरात रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या दफनविधी येत्या तीन चार दिवसात बगदाद शहरातच होणार आहे, बगदाद हे शहर मुस्लिम समाजात पवित्र स्थल मानले जाते म्हणून त्याच ठिकाणी दफनविधी केली जाणार आहे त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी व तीन भाऊ चार बहिणी असा परिवार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम