महाराष्ट्र केसरीची भारत केसरीवर मात…
(आबिद शेख) अमळनेर तालुका तालीम संघातर्फे आयोजित कुस्त्यांच्या विराट दंगलीत मुख्य व मानाच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी बाला रफीक याने महान भारत केसरी भारत मदने याच्यावर विजय मिळवला.
तब्बल ४५ मिनिटे दोघा पहेलवानांची झटापट सुरू होती. कोणीच कोणाच्या तावडीत सापडत नव्हते. अखेरीस नव्याने कुस्ती सुरू करून जो पहिला डाव मारेल त्याला विजयी घोषित करण्याचा निर्णय पंचांनी घेतला आणि दोन मिनिटात बाला रफीक ने डाव टाकत भारत मदने चा ताबा घेतला पंचांनी निर्णय जाहीर केला. या कुस्ती स्पर्धांचे उदघाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अनिल पाटील , माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते देखील काही मानाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. या स्पर्धेसाठी माजी आमदार स्मिता वाघ , खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक डॉ अनिल शिंदे ,ऍड ललिता पाटील ,पराग पाटील , माजी नगरसेवक विक्रांत पाटील ,सामाजिक कार्यकर्ते विकी जाधव ,विशाल जाधव , विनोद भांडारकर ,हेमंत भांडारकर, हाजी शेखा प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. मानाच्या कुस्त्यांमध्ये पाचोऱ्याच्या हितेश पाटील वर मालेगावच्या सैफ अली पंजाबी याने विजय मिळवला ,चाळीसगाव च्या सोपान माळी याने भुसावळ च्या शादाब पहेलवान याला पराभूत केले. अमळनेरच्या निजामअली , पवन शिंपी ,ऋषिकेश पाटील , जळगावचा बंटी शिंदे यांच्या कुस्त्या आणि चुरशीच्या लढतीत मिळवलेले विजय लक्षवेधी होते. पंच म्हणून जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख , महाराष्ट्र चॅम्पियन रावसाहेब पाटील , चाळीसगावचे आण्णा कोळी ,आदिल शेख ,शब्बीर पहेलवान , विनोद निकम , राजू पहेलवान यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक संजय पाटील , प्रताप शिंपी , अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळू पाटील , संजय भिला पाटील ,भरत पवार यांचे सहकार्य लाभले. अनेक वर्षांनंतर कुस्त्या झाल्याने खड्डा जीन चे मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. अनेकांनी आपल्या आवडत्या पहेलवानांवर बक्षिसांची खैरात केली. सूत्रसंचालन ज्योतिराम वाझे (सांगली)व संजय पाटील यांनी केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम