लफग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही ; उद्धव ठाकरेंचा घणाघात !
दै. बातमीदार । १७ डिसेंबर २०२२ । भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांविषयी वादग्रस्त विधान करण्यात येत आहे. त्या अनुशगाने मुंबईत आज महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचा वाद चिघळला आहे. याच्या निषेधार्थ शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतल घटक पक्षांच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधीत केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना मी राज्यपाल मानत नाही. भाजपमधील नेत्यांना बौधिक दारिद्र्य आलं आहे. या लफग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असंही म्हटलं. दरम्यान मुंबईतली मोर्चाच्या गर्दीने सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडायला हवे. मात्र जर यांचे डोळे उघडले नाही, तर ते कधीच उघडून नये, असंही उद्धव म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईच पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, लोढा यांनी गद्दारांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केल्याने उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम