रोटरी क्लब अमळनेर तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व पं. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग तरुणीला सायकलीचे वाटप..

बातमी शेअर करा...

अमळनेर दिनांक (आबिद शेख) रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त या दोघां विभूतींना विनम्र अभिवादन करून रोटरी क्लब अमळनेर तर्फे दिव्यांग तरुणीला तीनचाकी सायकलचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मकसूद बोहरी यांनी सांगितले की कु.नाजीया बी शेख निसार ही तरुणी माझ्या दुकानावर सुमारे दोन अडीच वर्षांपूर्वी पासून येत होती आणि ती आली की दमून जायची . भर पावसाळ्यातील एक दिवस आली अचानक माझे तिच्या टायर व ट्यूब वर लक्ष गेले तर ते सर्व खराब झालेले होते व रिंग सुद्धा तुटलेली होती अशा प्रकारे एक दीड किलोमीटर पासून जाणे- येणे आणि थोडेसे बोलते केल्यावर तिने सांगितले इतर ठिकाणी घरकाम मजुरी करून तिचे हात आणि पाय रात्री फार दुखायचे आणि तिचे अश्रू अनावर झाले होते. ह्या गोष्टीची दखल घेऊन फेसबुकवर “आत्मनिर्भर “या सदराखाली मी आव्हान केले होते त्याला प्रतिसाद म्हणून अनेक लोकांनी देणगी देण्याची तयारी दर्शविली होती परंतु एका दात्याने आपले नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ही सायकल तिला उपलब्ध करून दिलेली आहे. रोटरी प्रेसिडेंट कीर्तीकुमार कोठारी यांनी दात्यांचे रोटरी क्लब अमळनेर तर्फे ऋण व्यक्त केले. याप्रसंगी मुलीने सुद्धा ऋण व्यक्त करून आपले आनंदाश्रू मोकळे करून दिले होते.

याप्रसंगी रोटरी क्लब अमळनेर तर्फे रोटरी प्रेसिडेंट कीर्तीकुमार कोठारी ,सेक्रेटरी ताहा बुकवाला, माजी प्रेसिडेंट रोटे अजय केले, माजी प्रेसिडेंट रोटे डॉ. दिलीप भावसार , माजी प्रेसिडेंट रोटे दिनेश रेजा , सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्री सुरेश गुरव ,रोटे मकसूद बोहरी,रोटे डॉ.विशाल जोशी,रोटे देवांग शहा, रोटे देवेंद्र कोठारी, रोटेअँनी मेहराज हुसेन, रोटे अहमद बुऱ्हानी, रोटे हितेश गोहिल आदी रोटेरीयन्स मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती पी.आर.ओ रोटे आशिष चौधरी यांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम