अभिनेते विक्रम गोखलेंना अखेरचा निरोप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ नोव्हेबर २०२२ । मराठी चित्रपटसृष्टी आपली छाप सोडणारे अभिनेते विक्रम गोखले यांचे आज २६ नोव्हेंबर निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी 1 वाजून 45 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात पत्नी वृषाली आणि दोन मुली आहेत. गोखले यांच्यावर साश्रू नयनांनी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतील इलेक्ट्रिक शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या 5 नोव्हेंबरपासून त्यांच्यावर मधुमेह आणि जलोदर झाल्यामुळे उपचार सुरू होते. परंतु उपचारांना प्रतिसाद देणे हळूहळू बंद झाले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.​​​​ ​​​गुरुवारपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असल्याचे वृत्त होते. मात्र आज सकाळी रुग्णालयाने जारी केलेल्या हेल्थ अपडेटमध्ये त्यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात आले होते.. मल्टीपल ऑर्गन फेल्युअर झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते व्हेंटिलेटवर होते.

विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांच्यासह जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे हे कलाकार दिसले. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी विक्रम गोखले रुग्णालयात दाखल होते. रुग्णालयातून सुटी मिळताच त्यांनी गोदावरी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली होती. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची पावती मिळाला आहे. अलीकडेच ते छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसले होते. विक्रम गोखलेंनी मालिकेत गुरु पंडित मुकूल नारायण यांचे पात्र साकारले होते. यापूर्वी अग्निहोत्री मालिकेत विक्रम गोखलेंनी मोरेश्वर गोखलेंचे पात्र साकारले होते. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर ते या मालिकेत दिसले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम