चोरीच्या गुन्ह्यात फरार आरोपीला अटक ; एलसीबीची कारवाई

बातमी शेअर करा...

जळगाव ;-चोरीच्या गुन्ह्यातील जगदीश बाळू शेळके (२३, रा. पथराड, ता. भडगाव) हा गेल्या तीन वर्षांपासून फरार असताना त्याला गावात येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याची कारवाई २५ रोजी दुपारी ३ वाजता भडगाव तालुक्यातील पथराड येथे करण्यात आली.

चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील जगदीश शेळके हा तीन वर्षांपासून फरार होता. त्याच्या शोधार्थ चाळीसगाव शहर पोलीस पथक कामाला लागले होते. दरम्यान, फरार असलेला जगदीश शेळके हा भडगाव तालुक्यातील पथराड येथे आला असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. रविवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पथकातील पोउनि गणेश चौभे, विजयसिंग पाटील, लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, किरण चौधरी, सुधाकर आंभोरे, पोकॉ राहुल पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी जगदीश बाळू शेळके याला अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम