विरोधी पक्षनेते अजित पवार नागपुरातून मुंबईत ; शिंदे सरकारने दिले विमान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ डिसेंबर २०२२ । नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असतांना विरोधी पक्षनेते अजित पवार आज नागपुरातून तातडीने मुंबईकडे रवाना होणार आहेत. यावेळी त्यांना शिंदे सरकारकडून विमानही देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवार सध्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आहेत. तिथून ते कामकाजाचा अंदाज घेऊन निर्णय घेणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. दुपारी दीडच्या सुमारास ते नागपुरातून मुंबईकडे निघत असल्याची माहिती हाती येत आहे. या दौऱ्यासाठी अजित पवार यांना शिंदे सरकारकडून सरकारी विमान देण्यात आल्याची माहिती हाती येत आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामिनावर तुरुंगातून बाहेर येत आहेत. त्यांना भेटण्यासाठी अजित पवार जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम